Thursday, March 23, 2017

मॅगो पॅना कोटा

साहित्य
१ ) मॅगोपल्प  -  १ कप
२ ) दुध    -  १कप
३ ) फ्रेशक्रिम - १ कप
४ ) साखर - १ / २ कप
५ ) व्हॅनिला इसेन्स - १ चमचा
६ ) जिलेटीन - ३ चमचा
कृती -
१ ) एका बाऊल मध्ये पल्प  घ्यावा. १ १ / २ चमचा जिलेटीन  ३ चमचे कोमट पाण्यात घालावे व पल्प मध्ये एकत्र करावे आणि गाळून घ्यावे


जिलेटीन



२ ) काचेचे ग्लास आणि वाटी घ्यावी . वाटीत ग्लास तिरपा ठेवावा त्यात गाळलेला पल्प घालावा व २ तास फ्रिजर मध्ये ठेवावे सेट करण्यासाठी

३ ) नॉनस्टिक पॅनमध्ये दूधगरम करायला ठेवावे
४ ) त्यात साखर घालून ढवळावे
५ ) क्रिम घालावे
६ ) त्यात व्हॅनिला इसेन्स घालावे
७ ) एकीकडे मगाच सारखे जिलेटीन कोमट पाण्यात एकत्र करून ते दूधात मिक्स करावे थोडे कोमट होऊ दयावे
८ ) पल्पसेट झाल्यावर असे तयार होते '

९ ) ग्लास सरळ करून त्यात दूध घालावे
फिज मध्ये सेट करावे


थंड सव्ह करावे