Saturday, November 4, 2017
Friday, September 15, 2017
स्टफ भोपळी मिरची ( अंड)
साहित्प
१ ) भोपळी मिरची - ४ नग
२ ) अंडे . ४ नग
३ ) कांदा - २ नग
४ ) टॉमेटो - २ नग
५ ) लिंबूरस
६ ) मीठ
७ ) तिखट
८ ) चाट मसाला
९ ) गरम मसाला
१० ) बटर
कृती
१ ) मिरच्या धुऊन, पुसुन घ्याव्यात व फक्त देठाच्या जवळ गोल कापून आतिल बिया काढून टाकाव्यात
२ ) कांदा , टॉमेटो एकदम बारीक चिरावे
३ ) भोपळी मिरचीमध्ये अंडयाचे पांढरे घालावे किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , नंतर टॉमेटो घालावा , परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , कांदा घालावा परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , अंडयातील पिवळे घालावे परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , थोडासा लिंबाचा रस घालावा वरती मिरचीच्या देठाचे झाकण ठेवावे
४ ) फ्रायपॅन मध्ये बटर घालून या भरलेल्या मिरच्या वाफवाव्यात
आणि गरम गरम सॉस बरोबर दयावे
याच पद्धतीने स्टफ टॉमेटो करता येईल

Thursday, March 23, 2017
मॅगो पॅना कोटा
साहित्य
१ ) मॅगोपल्प - १ कप
२ ) दुध - १कप
३ ) फ्रेशक्रिम - १ कप
४ ) साखर - १ / २ कप
५ ) व्हॅनिला इसेन्स - १ चमचा
६ ) जिलेटीन - ३ चमचा
कृती -
१ ) एका बाऊल मध्ये पल्प घ्यावा. १ १ / २ चमचा जिलेटीन ३ चमचे कोमट पाण्यात घालावे व पल्प मध्ये एकत्र करावे आणि गाळून घ्यावे
२ ) काचेचे ग्लास आणि वाटी घ्यावी . वाटीत ग्लास तिरपा ठेवावा त्यात गाळलेला पल्प घालावा व २ तास फ्रिजर मध्ये ठेवावे सेट करण्यासाठी
३ ) नॉनस्टिक पॅनमध्ये दूधगरम करायला ठेवावे
४ ) त्यात साखर घालून ढवळावे
५ ) क्रिम घालावे
६ ) त्यात व्हॅनिला इसेन्स घालावे
७ ) एकीकडे मगाच सारखे जिलेटीन कोमट पाण्यात एकत्र करून ते दूधात मिक्स करावे थोडे कोमट होऊ दयावे
८ ) पल्पसेट झाल्यावर असे तयार होते '
९ ) ग्लास सरळ करून त्यात दूध घालावे
फिज मध्ये सेट करावे
थंड सव्ह करावे

जिलेटीन

Saturday, February 11, 2017
झणझणीत बटाटा रस्सा
झटपट आणि झणझणीत रस्सा
साहित्य -
१ ) छोटे ( दम आलूचे ) बटाटे -६ / ७ नंबर
२ ) ओले खोबरे -१ वाटी
३ ) ३ /४ लाल मिरच्या ( पाण्यात भिजवलेल्या )
४ ) १५ / १६ लसूण पाकळ्या
५ ) तेल - २ डावा
६ ) मिठ- चवीनुसार
७ ) चिंच- १ ते १ १ / २ इंच
कृती -
बटाटे उकडून सोलून घ्यावेत
भिजवलेल्या मिरच्या, ओले खोबरे, लसूण मिक्सिवर बारीक वाटून घ्यावे ( लागल्यास थोडेसे पाणी वापरावे )
चिंचेचा कोळ काढावा
पातेल्यात तेल गरम करावे त्यात वाटण घालावे व तेल सुटे पर्यन्त परतावे
त्यात चवीप्रमाणे मीठ , चिंच कोळ घालावे
त्यात बटाटे घालावेत
२ते ३ उकळ्या येऊ दयाव्यात
रस्सा तयार

टीप - मिरचीच्या तिखटा प्रमाणे मिरच्या ठरवाव्यात
किवा लाल तिखट
वरील साहीत्य दोन व्यक्तिंसाठी आहे
Monday, February 6, 2017
सफरचंदाचे पुडींग
साहित्य
१ ) अर्धा किलो सफरचंद
२ ) चार टेबलस्पून साखर
३ ) अर्ध्या लिंबाचा रस
४ ) दोन लवंगा
५ ) दोन वेलदोडा पूड किंवा व्हॅनिला इसेन्स
६ ) पाव किलो मारी बिस्किट
७ ) अर्धा किलो फ्रेश क्रिम
८ ) अर्धी वाटी पिठीसाखर
९ ) सजावटीसाठी डाळींब दाणे , सुकामेवा भरड
कृती
१ ) सफरचंदाची सालं काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत
२ ) चार टे स्पून साखर, अर्धा वाटी पाणी , त्याच्यात लवंगा, वेलदोडा पुड / व्हॅनिला इसेन्स घालून उकळी आणावी त्यात लिंबाचा रस पिळवा. सफरचंदाचे तुकडे घालावेत. एक मिनिट उकळी आली की बंद करावे
३ ) मारी बिस्किटचा चुरा करावा
४ ) क्रिम पातेल्यात घ्यावे बर्फावर ठेऊन फेटावे त्यात पिठीसाखर मिसळावी

५ ) काचेच्या बाऊल किंवा ग्लास मध्ये थोडा बिस्किट चुरा खाली घालावा त्यावर शिजवलेले सफरचंद घालावे त्यावर फेटलेले क्रिम घालावे अशाच पध्दतीने एका वर एक थर दयावेत, वरती डाळिंब दाणे, सुका मेवा भरड घालून फ्रिज मध्ये दोन तास सेट करायला ठेवावे
झाले आपले सफरचंद पुडिंग
टीप - फ्रेश क्रिमच वापरावे बिस्किटे छान मुरतात
Wednesday, January 25, 2017
टिप्स
- छोटे छोटे मोहरे बरेचदा मोठे काम करतात. स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणार्या या स्मार्ट टिप्सचेही असेत आहे. स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट व्हावा, जिन्नस टिकून राहावेत, त्यांचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी या टिप्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
- आज छोले करायची इच्छा झाल्यास - छोले पाण्याने धुवावे अाणि कुकरला एक शिट्टी द्यावी. दिड तास तसेच ठेवावे . . दिड तासात छोले भिजतील . . मग नेहेमी प्रमाणे परत शिजवून छोले करावेत. ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.
- नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.
- कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.
- भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.
- पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.
- जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.
- मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.
- आले स्वच्छ क रून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते.
- अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल.
- आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते.
- आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.
- आले, लसून, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होत
- बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.
- बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.
- कांदा रडवतो.. कान्दा कापताना पानी येउ नये म्हणून शेजारी मेणबत्ती जाळावी.
- - कान्दा कापल्यावर एक वायु त्यातुन निघतो ज्या मुळे डोळ्यातून पाणी येत. आणी शेजारी जर मेणबत्ति असेल तर त्या ज्योती मुळे हा वायु जळतो आणी डोळ्यातुन पाणी येत नाही.
- पाक उरलाय... उरलेल्या पाकाचा नेहेमी सुधारस करतात. पाकात थोडा लिम्बाचा रस पिळायचा आणी बदाम, बेदाणे, काजू असा हवा तो सुका-मेवा घालायचा. पोळीला लावून खायला छान लागतो
- उरलेल्या पाकात कणिक भिजून पुऱ्या किंवा पोळ्या करता येतील .
- शेवयाची खीर करताना पाक वापरला तर त्याचा लगदा होत नाही, त्यामुळे असा उरलेला पाक त्यासाठी वापरता येईल. तसेच फ़्रुट सलाड, मिल्क शेक यासाठी पण वापराता येतो. फ़ालुदा पण करता येईल
- पुदीना उरला आहे, तो कसा टिकवता येईल.?
- पुदिना, फ़्रीजमधे रुमालात गुंडाळुन ठेवला तर हळु हळु सुकत जातो, मग त्याची पुड करुन ठेवता येते. किंवा ताजा पुदीना बारिक वाटुन त्यात थोडे पाणी मिसळुन त्याचे आईस क्युब्ज करायचे आणि ते काढुन एका प्लॅष्टिकच्या बॅगमधे भरुन ठेवायचे. हे क्युब्ज जलजीरा मधे वापरता येतात. पुदिन्याची तयार पुड बाजारात मिळते. ती खास तंत्राने वाळवलेली असल्याने, हिरवीगार असते
- पोळी करुन झाली की ती पोळपाटावर झटकून घेतली तर पिठाचे कण पोळपाटावर सांडतात. मग ही पोळी पोळ्यांच्या hot pot मिळतो त्यात ठेवायच्या. असे जर केले तर पोळ्या गरम राहतात. काचेच्या बाऊल मधे त्यांना घाम येईल बहुतेक. कोरड्या कापडात शिदोरीसारख्या पोळ्या ठेवल्या तर सर्वात छान राहतात
- कुठलेही पदार्थ तळण्या आधी तेलात एक दोन चिमुट मिठ टाकावे पदर्थ तेलकट होत नाही. हिरव्या पालेभाज्या साफ़ करुन पेपर मधे व्रॅप करुन प्लस्टिक बॅग मधे घालुन फ़्रिज मधे ठेवा, ८-१० दिवस छान रहातात.
- भरितासाठी वांगे भाजल्यावर ५-१० मिनिटे पातेल्यात झाकण लावुन ठेवावे. नंतर सरळ देठाला धरुन नळाखाली धरावे, एकदम साफ़ होते.
- पुरण पातळ झाले तर थोडा खाण्याचा सोडा टाकुन परत शिजवावे. पुरण घट्ट होते.
Saturday, January 14, 2017
लाल भोपळी मिरची, टॉमॅटो सूप
साहित्य-
१ ) लाल भोपळी मिरची - २ नग
२ ) लाल टॉमेटो - ४ नग
३ ) लाल तिखट मिरची - १ किंवा २
४ ) लसूण - ३ते ४ पाकळ्या
५) तेल - २ चमचे
६) दूध - १ / २ कप
७) कॉर्न प्लोअर _ १ चमचा
८ ) मिरपूड
९ ) मीठ
१0) साखर -१ चमचा
११ ) क्रीम _ १ चमचा
१२ ) पाणी
कृती -
भोपळी मिरची तेल लावून गॅसवर( किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्यावे . लगेच पाण्यात घालावे , २ मिनिटे ठेवून बाहेर काढावे
जळलेला भाग हाताने काढावा बिया काढून मोठे तुकडे करावेत
टॉमेटो चे मोठे तुकडे करावेत , थोडया पाण्यात शिजवून घ्यावेत
लाल मिरची तुकडे करावेत
भोपळी मिरची, मिरची ,टॉमेटो, लसूण मिक्सरवर खूप बारीक ( पेस्टसारखे ) वाटून घ्यावे
गार दूधात कॉर्न प्लोअर मिक्स करावे ( गुठळी रहाता कामा नये )
गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात मिक्सरवर फिरवलेले टॉमेटो मिरचीचे मिश्रण घालावे गरम करायला ठेवावे त्यात दूधाचे मिश्रण हळूहळू घालावे ढवळत रहावे
साखर घालावी (चव बघून आंबट असल्यास )
त्यात चवीनुसार मीठ घालावे
उकळी येऊ दयावी
आवडीनुसार मिरपूड घालावी
सव्हिग बाऊलमध्ये काढावे त्यावर फेटलेले क्रिम घालून गरम सव्ह करावे
टीप
१ ) कॉर्नफ्लोअर ऐवजी छोटा उकडलेला बटाटा किसून घालावा
२) लाल मिरची त्याच्या तिखीटा प्रमाणे वापरावी कारण नंतर मिरपूड घालायची असते
३ ) टॉमेटो ऐवजी _ ब्रोकोली, गाजर, कांदा तेलावर परतून मिक्सरवर वाटून वापरावे
४) भोपळी मिरची प्रमाणे टॉमेटो आणि मिरची भाजून घेतल्यास अजून छान चव येते
५) गॅस ऐवजी तंदूर( ओवमचाही वापर करता येतो )
६ ) आवडीनुसार ब्रेडक्रम्बस वापरावेत

Monday, January 9, 2017
साहित्य-
१ ) बासमती तांदूळ- ३ वाटया
२) पाणी - ४ वाटया
३) रिफाईड तेल
४ ) टॉमेटो - २५० ग्रॅम
५) बटाटे - २५० ग्रॅम
६ ) प्लॉवर -मध्यम गड्डा
७ ) मटार - १ वाटी
८) डबलबी( भिजवलेली) - १वाटी
९ ) गाजर - २५० ग्रॅम
१० ) कांदा - २५० ग्रॅम
११ ) मीठ
१२ ) उकडलेले बटाटे - २ नग
१३ ) काजू, बेदाणे, केशर
वाटण्यासाठी -
१ ) कांदे -२ नग
२ ) धने - ३ टे स्पू
३ ) खसखस - २ चमचे
४ ) वेलदोडे - ५
५ ) लवंगा - ६
६ ) दालचिनी - ४ तुकडे
७ ) आले - २ इंच
८ ) लसूण पाकळ्या - १० / १२
९ ) हिरव्या मिरच्या - ८ / १०
१० ) पुदिना - १ वाटी
११ ) हळद
१२ ) तिखट
कृती -
तांदूळ धुऊन त्यात पाणी, १चं मिठ , १च तेल घालून ९० % मोकळा भात शिजवून घ्यावा
उकडलेल्या बटाट्याच्या पातळ चकत्या कराव्यात
कांदा उभा चिरावा त्याला थोडी साखर लावून १० मिनिटे ठेवावे , मग रिफाईड तेलात तळून घ्यावे
कच्चे बटाटे -उभे चिरून तळून घ्यावे
काजू, बेदाणे तळून घ्यावेत
केशर थोडे गरम करून त्यात थोडे दूध घालून ठेवावे
वाटण्यासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे
सर्व भाज्या मध्यम आकारात चिरुन घ्याव्यात
कांदा आणि बटाटा तळलेल्या तेलात बारीक चिरलेला टॉमेटो घालून खूप परतावे , एक वाफ दयावी , त्यात सर्व भाज्या घालाव्यात परतावे त्यात वाटण. घालून चांगले परतावे थोडेसे पाणी घालून दोन वाफा येऊ दयाव्यात त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे
बिर्याणीसाठी दुसरे जाड बुडाचे पातेले घ्यावे पातेल्यात थोडे तेल घालावे तळाशी उकडलेल्या बटाटयाचे स्लाईस लावावेत त्यावर थोडा भात पसरवावा , त्यावर भाजी पसरवावी तळलेला कांदा पसरावा परत भात , भाजी, भात अश्या प्रकारे थर दयावेत त्यावर साजूक तूप, केशरदूध, काजू, बेदाणे घालावे
झाकण ठेवावे त्याला कणीकेने बंद करावे
१/२ वाफ दयावी ,
एका बाऊल मध्ये बिर्याणी काढून त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा घालून सव्ह करावे

Sunday, January 1, 2017
व्हेज / चिकन ग्रिल्ड सँडविच
साहित्य-
१ ) हिरवी चटणी- कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मिठ थोडासे ओले खोबरं
२) व्हेज मेयोनिज
३ ) किसलेले गाजर (अर्धी वाटी)
४ ) उभा पातळ चिरलेला कोबी (अर्धी वाटी )
५) थोडी कांद्याची पात( चिरलेली)
६) बारीक चिरलेला कांदा (अर्धी वाटी)
७) मिरपूड
८) चिलीप्लेक्स
९) बटर
१०) मीठ
११) आवडत असल्यास बारीक चिरलेली हिरवी मिरची
१२ ) सँडविच ब्रेड
१३) स्लाईस चिज
नॉनव्हेजिटेरीन असाल तर
चिकन वाफवलेले, बारीक केलेले
कृती-
१) प्रथम मेयॉनीज मध्ये गाजर, कोबी, कांदा, मीठ, मिरपूड, चिलीप्लेक्स, पात एकत्र करावे
२) २ ब्रेड स्लाईस ला थोडे बटर लावावे त्यातील एका स्लाईस वर थोडी चटणी लावावी त्यावर मेयॉनिज मिक्स भरपूर लावावे
३ ) त्यावर चिज स्लाईस ठेवावे
४ ) त्यावर दुसरा स्लाईस ठेकून ग्रिल्ड करावे
नंतर काढत्या वर मग बटर लावावे मग हवा तसे कट करावे
सॉस बरोबर सव्ह करावे
( नंतर बटर लावल्याने सँडविच कोरडे होत नाही, तसेच बटर ग्रिल्डला वाया जात नाही )

Subscribe to:
Posts (Atom)