Monday, February 6, 2017

सफरचंदाचे पुडींग


साहित्य
१ ) अर्धा किलो सफरचंद
२ ) चार टेबलस्पून साखर
३ ) अर्ध्या लिंबाचा रस
४ ) दोन लवंगा
५ ) दोन वेलदोडा पूड किंवा व्हॅनिला इसेन्स
६ ) पाव किलो मारी बिस्किट
७ ) अर्धा किलो फ्रेश क्रिम
८ ) अर्धी वाटी पिठीसाखर
९ ) सजावटीसाठी डाळींब दाणे , सुकामेवा भरड
कृती
१ ) सफरचंदाची सालं काढून मध्यम आकाराचे तुकडे करावेत
२ ) चार टे स्पून साखर, अर्धा वाटी पाणी , त्याच्यात लवंगा, वेलदोडा पुड / व्हॅनिला इसेन्स घालून उकळी आणावी त्यात लिंबाचा रस पिळवा. सफरचंदाचे तुकडे घालावेत. एक मिनिट उकळी आली की बंद करावे

३ ) मारी बिस्किटचा चुरा करावा

४ ) क्रिम पातेल्यात घ्यावे बर्फावर ठेऊन फेटावे त्यात पिठीसाखर मिसळावी

५ ) काचेच्या बाऊल किंवा ग्लास मध्ये थोडा बिस्किट चुरा खाली  घालावा त्यावर शिजवलेले सफरचंद घालावे त्यावर फेटलेले क्रिम घालावे अशाच पध्दतीने एका वर एक थर दयावेत, वरती डाळिंब दाणे, सुका मेवा भरड घालून फ्रिज मध्ये दोन तास सेट करायला ठेवावे

झाले आपले सफरचंद पुडिंग

टीप - फ्रेश क्रिमच वापरावे बिस्किटे छान मुरतात

5 comments:

  1. Is it ok to use whipped cream instead of cream ??

    ReplyDelete
  2. फ्रेश क्रिमच वापरावे बिस्किटे छान मुरतात

    ReplyDelete