Saturday, February 11, 2017

झणझणीत बटाटा रस्सा



झटपट आणि झणझणीत रस्सा
साहित्य -
१ ) छोटे ( दम आलूचे ) बटाटे -६ / ७ नंबर
२ ) ओले खोबरे -१ वाटी
३ ) ३ /४ लाल मिरच्या ( पाण्यात भिजवलेल्या )
४ ) १५ / १६ लसूण पाकळ्या
५ ) तेल - २ डावा
६ ) मिठ- चवीनुसार
७ ) चिंच- १ ते १ १ / २ इंच
कृती -
बटाटे उकडून सोलून घ्यावेत
भिजवलेल्या मिरच्या, ओले खोबरे, लसूण मिक्सिवर बारीक वाटून घ्यावे ( लागल्यास थोडेसे पाणी वापरावे )

चिंचेचा कोळ काढावा

पातेल्यात तेल गरम करावे त्यात वाटण घालावे व तेल सुटे पर्यन्त परतावे
त्यात चवीप्रमाणे मीठ , चिंच कोळ घालावे
त्यात बटाटे घालावेत
२ते ३ उकळ्या येऊ दयाव्यात
रस्सा तयार
टीप - मिरचीच्या तिखटा प्रमाणे मिरच्या ठरवाव्यात
         किवा लाल तिखट
       वरील साहीत्य दोन व्यक्तिंसाठी आहे

3 comments: