Friday, September 15, 2017

स्टफ भोपळी मिरची ( अंड)

साहित्प
१ ) भोपळी मिरची -   ४ नग
२ )  अंडे              .  ४ नग
३ ) कांदा              - २ नग
४ ) टॉमेटो            - २ नग
५ ) लिंबूरस
६ ) मीठ
७ ) तिखट
८ ) चाट मसाला
९ ) गरम मसाला
१० ) बटर

कृती
१ ) मिरच्या धुऊन, पुसुन घ्याव्यात व फक्त देठाच्या जवळ गोल कापून आतिल बिया काढून टाकाव्यात

२ ) कांदा , टॉमेटो एकदम बारीक चिरावे
३ ) भोपळी मिरचीमध्ये अंडयाचे पांढरे घालावे किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , नंतर टॉमेटो घालावा , परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , कांदा घालावा परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , अंडयातील पिवळे घालावे परत किंचीत मिठ आणि इतर सर्व मसाले भुरभुरावे , थोडासा लिंबाचा रस घालावा वरती मिरचीच्या  देठाचे झाकण ठेवावे
४ ) फ्रायपॅन मध्ये बटर घालून या भरलेल्या मिरच्या वाफवाव्यात

आणि गरम गरम सॉस बरोबर दयावे

याच पद्धतीने स्टफ टॉमेटो करता येईल

No comments:

Post a Comment