Monday, December 26, 2016

वन पॉट पास्ता





वन पॉट पास्ता
साहित्य
१) पेने पास्ता
२ ) भोपळी मिर्ची- हिरवी, पिवळी,ळाल( उभी चिरलेली )
३ ) ब्रोकोली ( चिरलेली )
४ ) मका दाणे ( वाफवलेले )
५) मिरपूड
६ ) जिरेपूड
७) तिखट/ चिली फ्लेक्स
८) मिठ
९ ) दूध
१०) भरपूर चीज
११) लसूण पाकळ्या ( बारीक चिरलेल्या)
कृती-
नॉनस्टीक पॅन थोडे तेल / बटर घालून सर्व भाज्या , थोडे मीठ घालून १ वाफ देणे बाजूला काढून ठेवणे, त्याच पॅनमध्ये थोडे तेल घ्यावे त्यात लसूण घालून परतावे त्यात पास्ता घालावा, पास्ता बुडेल इतके पाणी घालावे झाकण ठेऊन ५
/७ मिनिटे वाफवावे, मग त्यात दूध घालावे, चीज, मिरपूड मीठ, तीखट, जीरेपूड घालावे परत झाकण ठेऊन पास्ता शिजे पर्यन्त वाफ द्यावी त्यात सर्व भाज्या घालून परत परतावे एक वाफ द यावी , मस्त पास्ता तयार
( नॉनव्हेजीटे२ीयन असल्यास बोनलेस चिकन पास्ता शिजवतानाच घालावे )

No comments:

Post a Comment