Saturday, January 14, 2017

लाल भोपळी मिरची, टॉमॅटो सूप

साहित्य-
१ )  लाल भोपळी मिरची  - २ नग
२ ) लाल टॉमेटो  - ४ नग
३ ) लाल तिखट मिरची - १ किंवा २
४ ) लसूण - ३ते ४ पाकळ्या
५) तेल -  २ चमचे
६) दूध - १ / २ कप
७) कॉर्न प्लोअर _ १ चमचा
८ ) मिरपूड
९ ) मीठ
१0) साखर -१ चमचा
११ ) क्रीम _ १ चमचा
१२ ) पाणी



कृती -
भोपळी मिरची तेल लावून गॅसवर( किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्यावे . लगेच पाण्यात घालावे , २ मिनिटे ठेवून बाहेर काढावे
जळलेला भाग हाताने काढावा बिया काढून मोठे तुकडे करावेत
टॉमेटो चे मोठे तुकडे करावेत , थोडया पाण्यात शिजवून घ्यावेत
लाल मिरची तुकडे करावेत
भोपळी मिरची, मिरची ,टॉमेटो, लसूण मिक्सरवर खूप बारीक ( पेस्टसारखे ) वाटून घ्यावे
गार दूधात कॉर्न प्लोअर मिक्स करावे ( गुठळी रहाता कामा नये )
गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात मिक्सरवर फिरवलेले टॉमेटो मिरचीचे मिश्रण घालावे गरम करायला ठेवावे त्यात दूधाचे मिश्रण हळूहळू घालावे ढवळत रहावे
 साखर घालावी (चव बघून आंबट असल्यास )
त्यात चवीनुसार मीठ घालावे
उकळी येऊ दयावी
आवडीनुसार मिरपूड घालावी
सव्हिग बाऊलमध्ये काढावे त्यावर फेटलेले क्रिम घालून गरम सव्ह करावे
टीप 
१ ) कॉर्नफ्लोअर ऐवजी छोटा उकडलेला बटाटा किसून घालावा
२) लाल मिरची त्याच्या तिखीटा प्रमाणे  वापरावी कारण नंतर मिरपूड घालायची असते
३ ) टॉमेटो ऐवजी _ ब्रोकोली, गाजर, कांदा तेलावर परतून मिक्सरवर वाटून वापरावे
४) भोपळी मिरची प्रमाणे टॉमेटो आणि मिरची भाजून घेतल्यास अजून छान चव येते
५) गॅस ऐवजी तंदूर( ओवमचाही वापर करता येतो )
६ ) आवडीनुसार ब्रेडक्रम्बस वापरावेत

5 comments: